loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजात श्रीराम पुलाजवळ वहाळ तुंबल्याने नागरिकांच्या घरात पाणी

लांजा (संजय साळवी) - शुक्रवारी रात्रभर कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे लांजा शहरातील मुंबई-गोवा महामार्गावरील श्रीराम पुलाजवळील वहाळ तुंबल्याने पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आसपासच्या भागातील अनेक घरांत पाणी शिरले. त्यामुळे परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून नागरिकांना मदत म्हणून जेसीबी मशीन पाठविण्यात आले, परंतु तोपर्यंत स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी लोकांच्या मदतीसाठी धावून गेले होते. यातील काहींनी स्वतःच्या मालकीचे जेसीबी मशीन बोलावून वहाळात टाकण्यात आलेली माती हटविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर उशीरा ठेकेदार कंपनीची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. तब्बल तीन तासानंतर पाणी ओसरू लागल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg