loader
Breaking News
Breaking News
Foto

सर्वसामान्यांचा नेता – राजेंद्र महाडिक यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात

देवरुख ( संदेश सप्रे ) लहानपणापासूनच गोरगरीब माणसांमध्ये रमणारे, सर्वांना आपलेसे करणारे आणि माणसांशी जिव्हाळ्याचे नातं जपत सामान्य घरातून असामान्य प्रवास करणारे राजेंद्र महाडिक यांचा वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात संपन्न झाला . राजेंद्र उर्फ अण्णा महाडीक यांची शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा व शिवसेनेवर असलेली निष्ठा हाच अण्णांच्या कार्याचा पाया आहे. म्हणूनच तालुक्यात शिवसेना पाया मजबुतीने उभा आहे असे गौरवोद्गार पालकमंत्री उदय सामंत यांनी काढत राजू महाडीक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवसेनेचे धडाडीचे नेते राजू महाडीक यांचा वाढदिवस कसबा येथील संभाजी स्मारकाजवळील उभारलेल्या सभामंडपात साजरा करण्यात आला. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यकर्ते, गोरगरीब, शेतकरी किंवा कुणीही अडचणीत असला तर अण्णा नेहमी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहतात. म्हणूनच लोक विश्वासाने अण्णाकडे येतात यातुन त्यांच्याकडे असणारी आत्मियता दिसून येते असे माजी जिप अध्यक्ष रोहन बने यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कार्यक्रमाआधी कसबा येथील घरगुती कार्यक्रमात त्यांच्या पत्नी सौ.रचना यांचेसह बहीणी, भावजय, मुलगी, पुतण्या आदी नातलगांनी ६१ दिवे प्रज्वलित करून ओवाळणी करत केक कापत घरात वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांच्या मातोश्री, पत्नी, मुली, बहीण, भाऊ सुजित, संतोष, भावजया, पुतण्या शौर्य. समस्त महाडीक परीवार यांचेसह स्नेही सुरेश सप्रे. जे. डी. पराडकर, दीपक भोसले, मकरंद सुर्वे आदी उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg