loader
Breaking News
Breaking News
Foto

कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या घनकचरा प्रकल्पासंदर्भात उपोषणाची खासदार राणे यांच्याकडून दखल

लांजा - घनकचरा (डम्पिंग ग्राऊंड) प्रकल्पासंदर्भात कोत्रेवाडी नागरिकांची तातडीने भेट घेवून त्यांचे म्हणणे रेकॉर्ड करा आणि मला तातडीने माहिती सादर करा असे आदेश रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. कोत्रेवाडी घनकचरा (डम्पिंग ग्राउंड) प्रकल्पासंदर्भात गेल्या ८० दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या लांजा कोत्रेवाडी नागरिकांच्या प्रश्नासंदर्भात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी रत्नागिरी येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात लक्षवेधी प्रश्न मांडला होता. त्यानंतर खासदार नारायण राणे यांनी जिल्हा प्रशासनाला याबाबत तातडीने संबंधित नागरिकांची भेट घेवून माहिती सादर करा असे आदेश दिले आहेत. लांजा नगरपंचायतीच्यावतीने कोत्रेवाडी येथे घनकचरा प्रकल्प (डम्पिंग ग्राउंड) प्रस्तावित आहे. लोकांना देशोधडीला लावणारा हा प्रकल्प रद्द करावा किंवा अन्य ठिकाणी स्थलांतरित करावा या मागणीसाठी कोत्रेवाडी नागरिक १४ ऑगस्ट पासून साखळी उपोषणाला बसलेले आहेत. गेले ८० दिवस झाले तरीदेखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथे पार पडलेल्या खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात भाजपाचे माजी नगरसेवक आणि जिल्हा उपाध्यक्ष असलेले संजय यादव यांनी विशेष लक्षवेधी प्रश्न मांडला होता. कोत्रेवाडी नागरिक या प्रकल्पा विरोधात १४ ऑगस्ट पासून उपोषणाला बसलेले आहेत. कोकणातील प्रमुख सण असलेला गौरी गणपती, दसरा त्याचप्रमाणे दिवाळी हे सण देखील या नागरिकांचे उपोषणामध्येच गेले आहेत. आज या उपोषणाला ८० दिवस होवून देखील प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याची बाब जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी खासदार नारायण राणे यांच्या जनता दरबारात प्रकर्षाने मांडली होती. नागरिकांची बाजू तसेच एकूणच वस्तुस्थिती संजय यादव यांनी यावेळी खासदार नारायण राणे यांच्या समोर कथन केली होती. ही बाब लक्षात घेवून खासदार नारायण राणे यांनी देखील जिल्हा प्रशासनाला तात्काळ माहिती घेवून म्हणणे तात्काळ रेकॉर्ड करून मला त्यासंबंधी माहिती द्यावी असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. इतक्या दीर्घकाळ लोक उपोषणाला बसणे हे योग्य नाही अशा शब्दात खासदार नारायण राणे यांनी प्रशासनाच्या कारभाराबात नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे प्रशासनाने तातडीने संबंधित जनतेची बैठक घ्यावी असे देखील आदेश खासदार राणे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

टाइम्स स्पेशल

दरम्यान, याबाबत प्रशासन माणुसकी धर्म विसरून कोत्रेवाडी नागरिकांशी वागत असून हे योग्य नाही. म्हणूनच आपण या संदर्भात खासदार नारायण राणे यांच्याशी बोललो असून त्यांनी दिलेल्या आदेशामुळे लवकरच लोकांना ठोस असे उत्तर मिळेल असा विश्वास जिल्हा उपाध्यक्ष संजय यादव यांनी यावेळी व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg