loader
Breaking News
Breaking News
Foto

पावस येथे शेख महंमद पीर उरूसास 4 नोव्हेंबर 2025 पासून प्रारंभ

गावखडी /वार्ताहर रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस गावात शेख महंमद पीर यांचा उरूस शुक्रवार दिनांक 4 नोव्हेंबर 2025 पासून प्रारंभ होणार आहे. हजरत महंमद पीर 225 वर्षांपूर्वी पैगंबरवाशी झाले तेव्हापासून त्यांचा उरूस कार्तिक पौर्णिमा दिवशी साजरा होत आहे. पावस येथे सालाबाद प्रमाणे शेख महंमद पीर दर्गा उरूस दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी रात्रौ. 10.30 वाजता मिरवणुकीने येऊन समाधीवर चंदन चढवून सुरूवात होणार आहेत. दिनांक 5 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11 वाजता शेख महंमद बाबांच्या समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र ( गिलाफ) परिधान करण्यात येणार आहेत. दिनांक 6नोव्हेंबर 2025 रोजी हजरत महंमद पीर दर्गा पावस आणि इन्फिगो आय केअर हाॅस्पीटल रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्रतपासणी शिबीर स..10 ते संध्याकाळी 5पयत , उरूसाचा सांगता समारंभ भाविकांना दर्शनासोबत महाप्रसाद रात्रौ. 7.30ते रात्री. 10 वाजता देऊन करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हजरत महंमद पीर जागृत देवस्थान असून नवसाला पावत असल्यानेच सर्व धर्मीय लोक पावस येथे दरवर्षी नवस फेडायला येतात. येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी चहा,थंड पेय ,खाद्यपदार्थ प्रसादाचे साहित्य यांची दुकाने सज्ज असतात.तीन दिवस या उरूस निमित्त त्यांची चांगलीच कमाई होत आहे. विश्वस्त मंडळ शेख महंमद पीर दर्गा पावस हे व्यवस्थापन पाहत असून या मंडळाचे अध्यक्ष फैअली हुसेनखान फडनाईक आणि दाऊद महामूद मुजावर आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सर्व भाविकांनी या उरूसास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg