म्हसळा - रायगड म्हसळा नगर पंचायत प्रभागात मंजूर करण्यात आलेल्या तब्बल १ कोटी ३८ लाख रुपयांच्या सात विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विकासकामांमध्ये प्रामुख्याने बंडू जोशी यांचे घर ते जुने रजिस्टर ऑफिस या दरम्यानच्या रस्त्याचे लोकार्पण, राधाकृष्ण मंदिर ते रमेश जैन यांचे बिल्डिंग या दरम्यान बांधलेल्या गटाराचे लोकार्पण, प्रभाग क्र. ४ मधील अल्ताफ दफेदार ते मुकादम चाळीपर्यंत हायमास्ट दिवे बसविण्याच्या कामाचे भूमीपूजन, प्रभाग क्र. ४ मधील मन्सूर दरोगे ते इम्तियाज दफेदार यांच्या घरापर्यंत हायमास्ट दिवे बसविण्याचे भूमीपूजन, आदिवासीवाडी येथे बांधलेल्या धूप प्रतिबंधक संरक्षण भिंतीचे लोकार्पण, हिंदू स्मशानभूमीच्या विद्युतीकरण कामाचे भूमीपूजन, तसेच सावर गौळवाडी मुख्य रस्त्यालगत (नदीशेजारी) बांधलेल्या संरक्षण भिंतीचे लोकार्पण यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी महेश पाटील, प्रभारी तहसीलदार श्रीमती अंबुर्ले, मुख्याधिकारी विठ्ठल राठोड, सपोनी रविंद्र पारखे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्षा फरहीन बशारत, उपनगराध्यक्ष अनिकेत पानसरे, जिल्हा चिटणीस महादेव पाटील, माजी सभापती छाया म्हात्रे, हिंदु समाज अध्यक्ष नंदू गोविलकर,गटनेते संजय कर्णिक, नगरसेवक संजय दिवेकर, सुनिल शेडगे, नगरसेविका सरोज मंगेश म्हशिलकर, महिला अध्यक्षा शगुप्ता जहांगीर, वृषाली घोसालकर, अनिल बसवत, नाना सावंत, किरण पालांडे, गजानन पाखड, शाहिद यूकये, मुबीन हुर्जुक, सुहेब हळदे, शेखर खोत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच म्हसळा नगरात मंजूर व पूर्णत्वास आलेल्या इतर विकासकामांचे उद्घाटनही येत्या काही दिवसांत करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. या कार्यक्रमामुळे म्हसळा नगरात विकासाची गती वाढेल आणि नागरिकांना आवश्यक सुविधा अधिक चांगल्या प्रकारे उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला.

















































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.