loader
Breaking News
Breaking News
Foto

आबलोली येथे कार्तिकी एकादशी निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील आबलोली बाजारपेठेतील श्री. विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकी एकादशी निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाचा आबलोली पंचक्रोशीतील नागरिकांनी मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन श्री. विठ्ठल रखुमाई प्रसादिक भजन मंडळ आबलोली कोष्टेवाडी या मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष महेंद्र रेडेकर, उपाध्यक्ष अजित रेपाळ, सचिव सुधाकर उकार्डे, खजिनदार दिनेश नेटके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार दिनांक 2 /11/2025 रोजी सकाळी 06:00 वाजता अभ्यंग स्नान, सहस्त्रनाम व काकड आरती त्यानंतर दुपारी 12:00 वाजता मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम होईल त्यानंतर दुपारी 03:00 ते संध्याकाळी 05:00 या वेळेत महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर रात्री 09:00 ते 11:00 यावेळी ह. भ. प. चितळे महाराजांचे स्वर कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे. त्यानंतर रात्रौ 12:00 वाजता पालखी सोहळा आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 03/11/2025 रोजी दुपारी 01:00 वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 07:00 वाजता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

मंगळवार दिनांक 04/ 11 /2025 रोजी सकाळी 10:00 वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे. दुपारी 01:00 वाजता महाप्रसाद त्यानंतर दुपारी 03:00 वाजता लकी ड्रॉ सोडत त्यानंतर रात्रौ 09:30 वाजता जय हनुमान मंच चिपळूण (बंडू पिरदनकर निर्मित ) "महाराष्ट्राची लोककला" अस्सल मराठी संस्कृतीचा स्त्री-पात्रांसह विनोदाची धमाल हा कार्यक्रम सादर होणार आहे. तरी या संपूर्ण कार्यक्रमाला आबलोली पंचक्रोशीतील जनतेने बहुसंख्येने उपस्थित रहावे असे जाहीर आवाहन श्री विठ्ठल रखुमाई मंडळ आबलोली कोष्टेवाडी, नवतरुण मित्र मंडळ आबलोली, महिला मंडळ सभासद यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg