loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथील धनंजय रहाटवळ यांचा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग

दापोली (प्रतिनिधी) - दापोली तालुक्यातील ताडील, सुरेवाडी येथील मुळ रहिवासी असलेले धनंजय कृष्णा रहाटवळ हे सध्या गिम्हवणे (आझादवाडी) येथे वास्तव्यास आहेत. सन २००६ साली त्यांनी दापोली येथे एका छोट्याशा गाळ्यातून व्यवसायाची सुरुवात केली. सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी हा छोटा उद्योग वाढवत नेला आणि आज MIDC वळणे, ता. दापोली येथे त्यांनी स्वतःची कंपनी सुरू करून स्थानिक युवकांना मोठी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

देशांतर्गत व्यापारासाठी त्यांनी प्रांजल पोलिमर्स ही कंपनी स्थापन केली तर आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रांजल पोलिमर्स इंडिया प्रा. लि. ही कंपनी उभारली. देशातील विविध EXHIBITION (EXPO) मध्ये त्यांनी यशस्वी सहभाग नोंदविला असून आता पहिल्यांदाच ते देशाबाहेर होणाऱ्या ADIPEC EXHIBITION, ABU DHABI (UAE) या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सहभागी होत आहेत. दापोलीचे नाव जागतिक स्तरावर नेल्याबद्दल धनंजय कृष्णा रहाटवळ यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg