loader
Breaking News
Breaking News
Foto

आमदार किरण सामंत यांच्या हस्ते स्ट्रीट लाईटचे लोकार्पण

देवळे - देवळे गावातील मानेवाडी, सोनारवाडी, कुंभारवाडी आणि सुतारवाडी आज प्रकाशमय झाल्या आहेत. आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे गावात तब्बल ३८ स्ट्रीट लाईट बसविण्यात आल्या असून, त्यामुळे संपूर्ण गावात उजेडाची लखलख पसरली आहे. या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, रात्रीच्या वेळेस वाहतूक व नागरिकांची हालचाल अधिक सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. स्थानिक ग्रामपंचायत व नागरिकांनी आमदार किरण सामंत यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले आहेत. गावाच्या विकासासाठी आणखी काही सुविधा उभारण्याचीही योजना असल्याचे ग्रामपंचायतीकडून सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आमदार किरण सामंत यांच्या प्रयत्नांमुळे तब्बल १३ लाख ९३ हजार रुपये खर्च करून गावातील ३८ स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. या कामाचे लोकार्पण आमदार किरण सामंत यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या वेळी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, गावातील मान्यवर नागरिक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या उपक्रमामुळे मानेवाडी, सोनारवाडी, कुंभारवाडी आणि सुतारवाडी या भागात आता रात्रीच्या वेळी प्रकाशमान वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गावातील सुरक्षेच्या दृष्टीने व रात्रीच्या वाहतुकीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सामंत यांच्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

या कार्यक्रमाप्रसंगी माजी शिक्षण सभापती विलास चाळके, माजी पंचायत समिती सभापती जया माने, उपजिल्हाप्रमुख राजेश पत्याने, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजू कुरूप, आरडीसी बँकेचे संचालक मुन्ना खामकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे, माजी जिल्हा परिषद सदस्य बापू सुर्वे, बापू शिंदे, विलास बेर्डे, रेश्मा परशेट्ये, बापू लोटनकर, राजेश कोळवणकर, निलेश कोळवणकर, दिलीप शिर्के, प्रभोद आटोळे, प्रकाश चाळके, बाळकृष्ण सपकाळ, दिनेश परेशेटे, विजया कोरगावकर राजेश रेवाळे, संजय काळोखे, विलास सुकम, बाबा भिंगार्डे, यश कोळवणकर, काशिनाथ सकपाळ, उमेश माने, विजय पांचाळ, महेंद्र चव्हाण, योगेश साळवी, प्रसाद आपणकर, यांच्यासहित गावातील प्रमुख मानकरी महिलावर्ग ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg