loader
Breaking News
Breaking News
Foto

प्रेरणा प्रभागसंघ, कोलगावची 'प्रकल्प मूल्यमापन कार्यशाळा' उत्साहात

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​प्रेरणा प्रभागसंघ, कोलगाव यांच्या वतीने PRI-CBO convergence अंतर्गत आयोजित 'प्रकल्प मूल्यमापन कार्यशाळा' कोलगाव सोसायटी सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यशाळेत विविध ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, उमेद अभियानाचे प्रतिनिधी आणि प्रकल्पाचे लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ​कार्यशाळेला कोलगावचे सरपंच संतोष राऊळ, ग्रामविकास अधिकारी अरुण जाधव, कुणकेरीच्या सरपंच सोनिया सावंत व उपसरपंच सुनील परब, कारिवडेच्या सरपंच आरती माळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक माळकर आणि आंबेगावचे उपसरपंच रमेश गावडे यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. ​प्रारंभी प्रार्थना आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. प्रभागसंघ अध्यक्ष सविता कासार यांनी गुलाब पुष्प देऊन सर्व मान्यवरांचे स्वागत केले. DRP श्रावणी वेटे यांनी कार्यशाळेचे प्रास्ताविक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मान्यवरांनी प्रकल्पांतर्गत केलेल्या विविध उपक्रमांच्या प्रदर्शनीला भेट देऊन कामाचे कौतुक केले. यानंतर बालसभा आणि अक्षर ज्योती प्रकल्पातील लाभार्थी तसेच LRP ताईंनी आपले मनोगत व्यक्त केले. म्हारकटेवाडी बालसभेचे प्रथमेश कडव व विद्या जंगले आणि लय भारी बालसभेचे सानिका सावंत, कावेरी व विठ्ठल सकपाळ. ​अक्षर ज्योती उपक्रमाच्या लाभार्थी विनिता जाधव व गंगा जाधव. तर हर्षदा कारीवडेकर, साक्षी राऊळ, वेदिया सावंत, रेखा डंकी उपस्थित होते. ​कोलगावचे सरपंच संतोष राऊळ यांनी यावेळी केलेल्या कामाचे कौतुक करत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी "ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीत बचत गटातील महिलांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देणार" असे जाहीर केले, ज्याचे उपस्थितांनी स्वागत केले.

टाइम्स स्पेशल

​या कार्यशाळेला कुडुंब श्री, केरळ NRO च्या मेंटॉर गिरिजा संतोष, तालुका अभियान कक्षातून BM MIS शिवानंद गवंडे, तसेच DRP, BRP, कार्यकारी समिती सदस्य, LRP ताई, CRP ताई, लिपिका, बालसभा व अक्षर ज्योती प्रकल्पाचे लाभार्थी उपस्थित होते. ​प्रभाग समन्वयक अभय भिडे यांनी प्रेरणा प्रभागसंघ व उमेद अभियानाच्या वतीने सर्व मान्यवरांचे आभार मानले. वंदे मातरम राष्ट्रगीताने कार्यशाळेची सांगता झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg