loader
Breaking News
Breaking News
Foto

बळीराजा संकटात! अतिवृष्टीमुळे भातशेतीचे अतोनात नुकसान

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेले भातशेतीचे मोठे नुकसान केले असून, शेतकरी हवालदिल झाला आहे. ’उगवलं, पिकलं पण पाऊस खायलाही देत नाही,’ अशा अवस्थेत बळीराजा असून, शासनाने सरसकट नुकसान भरपाई देण्याचा तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. उसवलं गणगोत सार आधार कुणाचा नाही अशी म्हणण्याची वेळ कोकणातील शेतकर्‍यांवर आली आहे. अतिवृष्टीमुळे भाताला कोंब आले असून, संपूर्ण पीक वाया गेले आहे. कोकणातील शेतकरी सहसा जाहीरपणे रडत नाही म्हणून शासन या नुकसानीकडे दुर्लक्ष करेल का, असा प्रश्न एका शेतकरी बांधवाने उपस्थित केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

’पिकलेलं पाऊस खायलाही देत नाही तर शेतकर्‍यांनी काय करायचं?’ असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत. शासनाची अनास्था असल्याचा अनुभव येत असून, सरकार दरबारी शेतकर्‍यांची ही आर्त हाक पोहोचायलाच पाहिजे, असे त्यांना वाटते. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी शासनाला आवाहन केले आहे की, कोणीतरी आपल्याला न्याय देईल या आशेवर असलेल्या या शेतकर्‍यांच्या हाकेची वेळीच दखल घ्यावी. पावसाळी शेती आणि बागायतीसाठी कर्ज घेतलेल्या शेतकर्‍यांकडे आता खायला पीकही नाही आणि कर्ज फेडायला हातात पैसाही नाही, अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. शासनाने संवेदनशीलपणे याकडे लक्ष देऊन तातडीने दिलासा द्यावा, अशी तीव्र मागणी जोर धरत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची सरसकट नुकसान भरपाईची मागणी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg