loader
Breaking News
Breaking News
Foto

दांडेली येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा उत्साहात

सावंतवाडी: दांडेली येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट भजन मंडळ प्रथम तर सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर द्वितीय तर श्रीदेव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवलीने तृतीय क्रमांक पटकावला. श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ दांडेली आयोजित भव्य जिल्हास्तरीय भजन स्पर्धा दिनांक ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडेली (श्री देव दाडोबा देवस्थान प्रवेशद्वार जवळ) येथे भजन मंडळ व भजन रसिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेतील निकाल पुढील प्रमाणे असून प्रथम क्रमांक:- श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ बुवा आशिष सडेकर, द्वितीय क्रमांक:- श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर बुवा हर्षल मेस्त्री, तृतीय क्रमांक:- श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली, तसेच वैयक्तिक पारितोषिके उत्कृष्ट हार्मोनियम:- बुवा योगेश मेस्त्री (श्री देव लिंगेश्वर पावणादेवी प्रासादिक भजन मंडळ कणकवली) उत्कृष्ट गायक:- बुवा आशिष सडेकर (श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ), उत्कृष्ट पखवाज:- शुभम गावडे (श्री रामकृष्ण हरी सेवा संघ पाट, कुडाळ), उत्कृष्ट तबला:- ओंकार मेस्त्री (श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर), उत्कृष्ट झांजवादक:- सिद्धेश चव्हाण (महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी), उत्कृष्ट कोरस:- श्री सदगुरू प्रासादिक भजन मंडळ अणसुर शिस्तबद्ध संघ:- सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ, जानवली यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून दीप्तेश मेस्त्री व भावेश राणे यांनी काम पाहिले. अवकाळी पाऊस असून सुद्धा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी मोठी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg