loader
Breaking News
Breaking News
Foto

ॐ साई विठ्ठल रखुमाई मंदिराच्या जिर्णोद्धारा निमित्त विविध कार्यक्रम

वेळणेश्वर (उमेश शिंदे) - रत्नागिरी तालुक्यातील ॐ साई विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, मुंबई पुणे मंडळ, हरचिरी, चिंचवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिर जीर्णोध्दार व कार्तिकी एकादशी सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी मूर्तीची मिरवणूक पार पडल्यानंतर मूर्तीची प्रतिस्थापना होम हवन, अभिषेक तसेच सायंकाळी आरती, रात्री भजन , तळेकरवाडी महिला मंडळाच्या वतीने जाकडी नृत्य पार पडले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रविवार दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ५ वाजता मूर्ती अभिषेक व आरती, सकाळी १०:३० वा. श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी २ वा.महिलांसाठी हळदीकुंकू सायंकाळी ४ वा. मुलांचे व महिलांचे सांकृतिक कार्यक्रम, रात्री ७ ते ८ वा. सुस्वर भजन, रात्री ८:३० वा.पालखी मिरवणूक, रात्री ११ वा. माऊली महिला नमन मंडळ रत्नागिरी यांचे चौरंगी नमन आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन निमंत्रक ॐ साई विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, मुंबई पुणे मंडळ, हरचिरी, चिंचवाडी यांनी केले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg