loader
Breaking News
Breaking News
Foto

अलिबाग समुद्रात दोघे बुडाले; ड्रोनच्या सहाय्याने शोध मोहीम सुरू

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - अलिबागच्या समुद्रकिनारी घडलेल्या एका दुःखद घटनेत दोन तरुण समुद्रात बुडून बेपत्ता झाले आहेत. सध्या पोलिस आणि जीवरक्षक दल ड्रोन तसेच बॅटरीच्या सहाय्याने या दोघांचा शोध घेत होते. बुडून बेपत्ता झालेल्या तरुणांची नावे शशांक सिंग (१९, रा. उलवे, ता. उरण) आणि पलाश पखर (१९, रा. सानपाडा, नवी मुंबई) अशी आहेत. हे दोघे आणि त्यांचे दोन मित्र उरण-नवी मुंबई परिसरातून शनिवारी अलिबागला फिरायला आले होते, अशी माहिती अलिबागचे तहसीलदार विक्रम पाटील यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संध्याकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास हे चार मित्र समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले. त्यातील एकजण अचानक बुडू लागल्याने दुसर्‍या मित्राने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही लाटांमध्ये अडकून बुडून बेपत्ता झाले. या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिस निरीक्षक किशोर साळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तत्काळ जीवरक्षक पथकांना पाचारण करून शोधमोहीम सुरु केली. रात्रीचा अंधार पडत असल्याने शोधकार्य अधिक कठीण झाले आहे. तरीदेखील ड्रोन आणि बॅटरी लाइटच्या मदतीने पोलिस, जीवरक्षक आणि स्थानिकांनी शोधमोहीम चालवली आहे. समुद्राच्या भरतीमुळे आणि जोरदार लाटांमुळे या शोध मोहिमेत अडथळे येत आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg