loader
Breaking News
Breaking News
Foto

लांज्यात श्री राम मंदिर नजिकच्या पुलाचे पाणि तुंबून नजिकच्या घरात शिरले

केळंबे-लाजा (सिराज नेवरेकर) - अवकाळी मुसळधार कोसळा-या पावसामुळे श्री राम मंदिर नजिकच्या पुलाचे पाणि तुंबून नजिकच्या घरात शिरून लोकांचे नुकसान झाले असल्याने लांजा राजापूरचे आमदार कीरण सामंत यांना माहीती मिळताच तात्काळ घटना स्थळी धाव घेऊन पहाणी केली व लोकांच्या घरांची साफ सफाई करून देण्याच्या सुचना संबंधित कंपनीला दील्या आहेत. लांजा बाजारपेठ येथील श्री राम पुलाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या सुरू असलेल्या कामाच्या निष्काळजीमुळे अवकाळी पावसाचे पाणी तुंबून येथील रहिवाशांच्या घरात पाणी घुसले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रात्री पाऊस जोरदार कोसळल्यामुळे आणि पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण झाला. पुलाच्या नजिक असलेल्या घरात चिखलयुक्त पाणि घरात शिरून नुकसान झाले. येथील घरातील लोकांचे झालेले नुकसान आणि घरात चिखल भरल्यामुळे चिखल साफ करून देण्याचे सूचना संबंधित कंपनीला दिल्या आहेत.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg