loader
Breaking News
Breaking News
Foto

संजय आखाडे यांची भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

खेड (प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टी उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्षपदी संजय आखाडे यांची नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, माजी आमदार सूर्यकांत दळवी, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे तसेच भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय आखाडे यांनी काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या सोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. पक्षप्रवेशानंतर त्यांनी अल्पावधीतच संघटनातील कार्यात सक्रिय सहभाग घेतला आणि कार्यकर्त्यांमध्ये दृढ संपर्क प्रस्थापित केला. त्यांच्या या कार्यतत्परतेची आणि पक्षनिष्ठेची दखल घेऊन पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास दाखवत जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नियुक्तीप्रसंगी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे म्हणाले की, संजय आखाडे हे परिश्रमी आणि लोकाभिमुख कार्यकर्ते आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे उत्तर रत्नागिरीतील भाजप संघटना अधिक मजबूत होईल. संजय आखाडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, भाजपच्या विचारधारेनुसार जनतेच्या प्रश्नांसाठी काम करणे आणि पक्ष संघटनाला अधिक बळकटी देणे हेच माझे ध्येय राहील. या कार्यक्रमानंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी जयघोष करत संजय आखाडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg