loader
Breaking News
Breaking News
Foto

हेमंत पयेर यांना पीएच.डी. पदवी प्रदान: वूडबॉल आणि योगा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडूचे मोठे यश'

आंतरराष्ट्रीय स्तरावर वूडबॉल आणि योगा या खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू हेमंत पयेर यांना नुकतीच कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे शारीरिक शिक्षण या विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. हेमंत पयेर यांनी आपल्या संशोधनासाठी "योग प्रशिक्षणाचा वूडबॉल खेळाडूंच्या कारक क्षमता व कामगिरीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास" या महत्त्वपूर्ण विषयाची निवड केली होती. या विषयावर त्यांनी सखोल संशोधन केले. त्यांना या संशोधनासाठी शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा डॉ. पी. आर. चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी आणि प्र. कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते त्यांना पीएच.डी. पदवीचे नोटिफिकेशन देण्यात आले. खेळ आणि शिक्षणाचा संगम साधत संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवणारे हेमंत पयेर हे माजी जिल्हा परिषद सदस्या गौरीताई पयेर यांचे सुपुत्र असून, त्यांच्या या कामगिरीने तालुक्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या या महत्वपूर्ण यशाबद्दल सामाजिक कार्यकर्ते परशुराम मांदाडकर, चंद्रकांत खोत, भाजप युवा उपाध्यक्ष निलेश मांदाडकर, माजी सभापती महादेवराव पाटील, १८ गाव आगरी समाज माजी अध्यक्ष संतोष पाटील,खरसई आगरी समाज अध्यक्ष महादेव नाक्ती यांच्यासह तालुक्यातील अनेक मान्यवरांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg