loader
Breaking News
Breaking News
Foto

परतीच्या पावसाने लांजात भातशेतीचे प्रचंड नुकसान, शेतकरी हवालदिल

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असुन तयार झालेल्या भातपीकाची नासाडी झाली आहे. भात पीक शेतातच पुर्णपणे पाण्यावर तरंगत असुन हाता तोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावून नेला असल्याने शेतकरी हाताश झाला आहे. वर्षभराची बेगमी करून ठेवायचे धान्याचे शेतात होत असलेले नुकसान पहावून शेतक-यांच्या डोळ्यात अश्रू तरळु लागले आहेत. शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन केली जात आहे. यंदा पावसाने शेतक-यांना हैराण करून सोडले आहे. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून जाऊ नये म्हणून शेतकरी जीवाचे रान करीत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भात कापणीला सुरूवात करताच परतीच्या पावसाने कापलेली भाते शेतातच भिजुन नुकसान झाले. तर रान डुकरांनी हैदोस घातला आहे पिकलेल्या शेतात शिरून नासधूस करीत आहेत. भाते कापायलाच नको अशी परीस्थिती प्राण्यानी करुन सोडली असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे बोलले जात आहे. गणपती पासून कापायला झालेली भात शेती पावसाने मध्यतंरी काही दीवस उघडीप घेतल्याने कापणीला वेग आला असताना परतीच्या पावसाने मुसळधार कोसळायला सुरूवात केली आहे. ती ’जारे..जारे..पावसा, म्हणण्याची वेळ शेतकरी वर्गावर येऊन ठेपली आहे. दिवाळीही झाली तरीही पाऊस जात नाही भाताच्या लोबींना कोंब येण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे शेतकरी वर्गातुन बोलले जात असुन जीवन जगायचे कसे याच विवंचनेत शेतकरी पडला असल्याचे बोलले जात आहे.

टाईम्स स्पेशल

निसर्गामध्ये अवलक्षणीय बदल झालेला दीसून येत आहे. जवळ जवळ सहा महिने पावसाला होत आले असताना पाऊस जाण्याचे लक्षण दीसुन येत नाही. म्हणून पुर्णपणे तयार झालेली भात शेती घरात येते कशी हा प्रश्न शेतक-यांना पडला असुन शेतकरी हवालदिल झाला आहेत. एकीकडे पाऊस नुकसान करीत असुन दुसरीकडे रानातील जनावरे ही नासधूस करीत असल्यामुळे शेतकरी रात्री दीवस शेतीचीच विवंचना पडला असल्याचे बोलले जात आहे. वर्षभर काबाडकष्ट करून राबराब शेतात राबून तयार झालेल्या भात पीकाचे नुकसान उघड्या डोळ्यांनी पहावत नाही असे शेतकरी वर्गातुन बोलले जात असुन यंदा ओळा दुष्काळ पडला असल्याचे बोलले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

ओळा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg