loader
Breaking News
Breaking News
Foto

हातभट्टीच्या तयार गावठी दारूसह एकाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई

ठाणे (प्रतिनिधी) - हातभट्टी लावून त्यातून निर्मिती केलेली गावठी दारूसह हातभट्टी लावणारा आणि गावठी दारूचे उत्पन्न काढणारा रुपेश नारायण पाटील (३५) याला १ हजार ११५ लीटर हातभट्टीची तयार दारूसह अटक करण्यात आल्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केल्याची माहिती ठाणे शहर पोलिस जनसंपर्क अधिकारी तथा वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश साळवी यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

भिवंडी गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार किशोर थोरात यांना ४ डिसेंबर रोजी मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव व त्यांच्या पथकाने रुपेश पाटील यांच्या भिवंडी आलिमघर, येथील राहत्या घराचा शेजारी खोलीमध्ये छापा टाकत कारवाई केली. त्यावेळी १ हजार ११५ लीटर हातभट्टीची तयार दारू असा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे पोलिसांनी सांगितले.

टाइम्स स्पेशल

या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक मिथुन भोईर, पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र जाधव, रविंद्र बी. पाटील, पोलिस हवालदार किशोर थोरात, प्रकाश पाटील, शशिकांत यादव, निलेश बोरसे व सर्फराज तडवी यांनी सहभाग घेतला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg