loader
Breaking News
Breaking News
Foto

जि.प. रत्नागिरी पुरस्कृृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा कडवईत संपन्न

कडवई, (संगमेश्वर) (वार्ताहर) - जिल्हा परिषद रत्नागिरी पुरस्कृत केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा केंद्र कडवई उर्दू प्रभाग कडवई येथे उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत केंद्रातील १२ शाळांनी सहभाग नोंदविला. दिवसभर खेळांचा जल्लोष, उत्स्फूर्त सहभाग आणि खेळाडूवृत्तीने परिसर दणाणून गेला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, लक्ष्मीमूर्तीला पुष्पमाला अर्पण, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून करण्यात आली. यानंतर मान्यवरांचे स्वागत व ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून स्पर्धांचे औपचारिक उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक रवींद्र कदम, शशिकांत साळुंखे, मधुकर वाजे, राजाराम देवपूजे, श्रीकृष्ण ताडे, समाधान पाटील, मुकुंद देशपांडे, दीपक टक्के, विजय माळी, अमोल इंगळे, संतोष शिंदे भागवत, कुलदीप गिरासे, अमोल भांगरे, नितीन झडगे सौ.सुनीता लेंडवे, निकहत मुल्ला, सरिता भांगरे, सुलभा कदम आरोग्य सेवक संतोष सोनवणे गटशिक्षणाधिकारी विजय परी शिक्षण विस्तार अधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, तालुका समन्वयक समीर काब्दुले, महाराष्ट्र उर्दू हायस्कूलचे मुख्याध्यापक रिजवान कारिगर, कडवई सरपंच सौ. विशाखाताई कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे, ग्रामसेवक चौधरी , पोलीस पाटील ओकटे, ग्रामस्थ प्रतिनिधी श्रीपत ओकट, े माजी पोलीस पाटील रमेश तुळसकर, हरिश्चंद्र धामणाक, माजी सरपंच प्रकाश कुंभार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीरंग कुंभार, दीपक तुळसणकर, समिती अध्यक्ष सोनाली कुंभार यांच्यासह कडवई यादववाडी, वरची-खालची कुंभारवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg