loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्य स्तरीय खो-खो स्पर्धेत रत्नागिरीच्या मुलींच्या संघाचा विजय

संगलट (खेड) (वार्ताहर) - महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने श्री बाणेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, बुर्‍हाणनगर येथे सुरू झालेल्या ५१ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेच्या साखळी सामन्यांत मुलींच्या गटात धाराशिव, सांगलीआणिरत्नागिरीच्या मुलींनी विजय मिळवला, तर मुलांच्या गटातयजमानअहिल्यानगर, पुणे, सोलापूर, ठाणे संघांनी विजय मिळवला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बुर्‍हाणनगर येथील अक्षय शिवाजीराव कर्डिले युवा प्रतिष्ठान, विश्वंभरा प्रतिष्ठान व बाणेश्वर क्रीडा मंडळ, बुर्‍हाणनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील मुला-मुलींचे संघ सहभागासाठी उपस्थित असून, ७ डिसेंबरपर्यंत सामने रंगणार आहेत. मुलींच्या गटात रत्नागिरी संघाने साजेसा खेळ करत जळगाव संघावर १ डाव ९ गुणांनी (१६-७) विजय मिळवला. पहिल्या डावात घेतलेल्या आघाडीच्या जोरावर हा सामना रत्नागिरीने सहज खिशात घातला. यामध्ये मृण्मयी नागवेकर ३ मिनिटे संरक्षण, रिद्धी चव्हाण २.३० मिनिटे संरक्षण, आर्या डोर्लेकरने २.३० मिनिटे संरक्षण, दिव्या सनगले २ मिनिटे संरक्षण खेळ केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg