loader
Breaking News
Breaking News
Foto

सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय शालेय कॅरम स्पर्धा: साडेतीन महिन्यांचा विलंब, विद्यार्थी संभ्रमात!

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - शालेय राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा येत्या २३ ते २५ डिसेंबर रोजी डेरवण, चिपळूण येथे आयोजित करण्यात आल्या असताना, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या जिल्हा आणि विभागीय स्पर्धा अजूनही आयोजित करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १४, १७ आणि १९ वयोगटातील मुला-मुलींच्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा १३ ऑगस्ट २०२५ च्या दरम्यान संपन्न झाल्या होत्या. या स्पर्धेनंतर सुमारे साडेतीन महिन्यांहून अधिक काळ उलटला तरी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना जिल्हा आणि विभागीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यासाठी वेळ मिळाला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आता राज्यस्तरीय स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना, २३ डिसेंबरपर्यंत जिल्हा आणि विभागीय स्तरावरील स्पर्धांची घाईघाईत सांगता करावी लागणार आहे. यामुळे निवड प्रक्रियेतील विद्यार्थ्यांची मोठी दमछाक होणार आहे. जिल्हा स्तरावरील स्पर्धा संपताच लगेच विभागीय स्पर्धेचे आयोजन, आणि त्यानंतर विभागीय स्पर्धेत यशस्वी झालेल्या निवडक विद्यार्थ्यांना चिपळूण, डेरवण येथे राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी तातडीने सहभागी व्हावे लागणार आहे. ​तालुकास्तरीय स्पर्धा घेऊनही जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी साडेतीन महिने जिल्हा स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यास जो विलंब लावला आहे, त्याबद्दल पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ​या स्पर्धा आयोजनातील जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दाखविलेल्या 'सुशेगाद' वृत्तीकडे जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांचे लक्ष वेधण्यात आले आहे. तसेच, पालकमंत्री नितेश राणे यांनी देखील जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अशी मागणी पालकांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg