loader
Breaking News
Breaking News
Foto

जेष्ठ नागरिकाला धमकावून ९७ लाखांची ऑनलाईन फसवणूक; दोन भामट्यांना अटक!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - जेष्ठ नागरिकाला अटक करण्याची धमकी देऊन तब्बल ९७ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणार्‍या दोघा भामट्यांना सिंधुदुर्ग पोलीसांनी अटक केली असून त्यांना सोमवार दि. ८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी आणखी तिघांच्या मागावर सिंधुदुर्ग जिल्हा गुन्हा अन्वेषण विभाग आहे. सावंतवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला मुंबई क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे भासवून अज्ञात सायबर गुन्हेगाराने ’मनी लॉन्ड्रींग’च्या खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली. या मानसिक दडपणाखाली ज्येष्ठ नागरिकाने आपली फिक्स डिपॉझिट, म्युचअल फंड, आणि शेअर्समधील सुमारे ९७ लाख रुपये १८ ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ऑनलाईन हस्तांतरित करून फसवणूक झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित नागरिकाने सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर अवघ्या तीन ते चार तासातच सायबर यंत्रणांचा वापर करून फसवणुकीच्या रकमेपैकी सुमारे नऊ लाख रुपये गोठवण्यात (होल्ट) सायबर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी विष्णू बांदेकर (वय ५७, रा. अंधेरी), तर समशेर खान (वय ३७, रा. मालवणी, मुंबई) या दोघांना अटक केली आहे. त्यांना सोमवार, ८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अज्ञात संशयितांनी पीडित ज्येष्ठ नागरिकाला व्हाट्सअप व्हिडिओ कॉल करून, ’मुंबई क्राईम ब्रँच अधिकारी’ असल्याची बतावणी केली. तुमच्या खात्यातून २५ लाखांचा व्यवहार मनी लॉन्ड्रीशी संबंधित आहे. त्वरित मुंबईत या किंवा आम्ही सांगतो तशी ऑनलाइन चौकशी करा, अशा धमक्या देऊन त्यांना मानसिक दडपण आणले.

टाईम्स स्पेशल

कायदेशीर अडचणीत सापडण्याची भीती मनात आल्याने पीडिताने फसवणूक करणार्‍यांना पैसे दिले. पोलिस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, उप अधीक्षक नयोनी साटम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक प्रवीण कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास परूळकर यांनी तपास यंत्रणा सुरू केली आहे. पोलिस चौकशीत समोर आले आहे की, ऑनलाईन फसवणूक हे मोठे जाळे आहे. अटकेत असलेल्यांना या रकमेतील टक्केवारी मिळणार होती, तर खरे फसवणूक करणारे पंजाब व अन्य प्रदेशातील आहेत, असा संशय पोलिसांना आहे. सध्या आणखी तिघा संशयितांच्या पाळतीवर पोलिस आहेत. या आणि अशा प्रकारच्या ऑनलाईन फसवणुकीपासून सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिसांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg