loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठानचेवतीने दादर चैत्यभुमीवर स्वच्छता मोहीम

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादर चैत्यभुमी येथे स्वच्छता मोहीम राबवित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली बारा वर्षे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभुमी येथे हा उपक्रम राबविला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते, अनुयायी दादर चैत्यभूमी स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मंडणगड (प्रतिनिधी) - मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दादर चैत्यभुमी येथे स्वच्छता मोहीम राबवित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. मंडणगड-दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली बारा वर्षे महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभुमी येथे हा उपक्रम राबविला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी प्रतिष्ठानचे शेकडो कार्यकर्ते, अनुयायी दादर चैत्यभूमी स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले. अभिवादनसाठी येणार्‍या लाखो अनुयायांना स्वच्छ व सुंदर चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांचे दर्शन व्हावे व स्वच्छतेचा नारा संपूर्ण भारतात पसरवा ही या मागची प्रतिष्ठानची भावना आहे. स्वच्छता अभियानात समाविष्ट झालेल्या युवक, युवतींना प्रतिष्ठानकडून प्रमाणपत्र देण्यात आले. यंदा दापोली मंडणगड तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष-सुमेध सकपाळ, उपाध्यक्ष सुनील तांबे, सचिव उज्वल खैरे, सहसचिव तुषार नेवरेकर, खजिनदार निखिल कवडे, संघटक - सचिन कांबळ, हिशोब तपासनीस सुदर्शन जाधव, सहसंघटक अजय अहिरे, सल्लागार ऍड. सुरेंद्र मर्चंडे, राहुल अहिरे व कार्यकर्त्यांसमवेत अनेक युवक, युवतींनी स्वच्छता मोहीमेसाठी मेहनत घेतली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg