loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

खेड - येथील श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२६ या नविन वर्षाच्या संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना संस्थेचे अध्यक्ष शितल पेठे, उपाध्यक्ष सुनिल मोघे, संचालक अंजली आघरकर, अपर्णा मोडक, अमोल भागवत संस्थेचे माजी अध्यक्ष व विदयमान सल्लागार विश्वास सोमण, संस्थेचे माजी अध्यक्ष अच्युत जोशी, संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी संदीप मोडक, खेड शाखेच्या शाखाधिकारी शैलजा बेंदरकर व प्रधान कार्यालय व खेड शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

श्री लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेने मागील २९ वर्षात लेखापरिक्षणात सातत्याने अ वर्ग संपादन केला आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या ठेव योजनेत सुमारे चार कोटीच्या नविन ठेवी संकलीत झाल्या असून एक प्रकारे सर्व सभासदांनी संस्थेवर दाखवल्याचे विश्वासाचे प्रतिकच म्हणावे लागेल. संस्थेमार्फत सोने तारण, वाहन तारण, स्थावर तारण, गृहतारण, जामिन तारण, कॅश क्रेडीट कर्जाचे कर्ज वाटप सुध्दा सुरु आहे. २०२५/२६ या आर्थिक वर्षात संस्थेचा एन पी ए चे प्रमाण ०% राहील तसेच सहकार खात्याकडून दिलेल्या निकषांचे प्रमाणात संस्थेचे कामकाज यशस्वी राखणार असल्याचा विश्वास संस्थेचे अध्यक्ष शितल पेठे यांनी दिनदर्शिकेच्या प्रकाशनाच्या वेळी व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg