मालवण (प्रतिनिधी) - मालवण समुद्र किनाऱ्यावर मासळी लिलावाच्या ठिकाणी कावळ्यांच्या गराड्यात सापडलेल्या दुर्मिळ अशा अमूर ससाणा या पक्ष्याची युथ बिट्स फॉर क्लायमेट यां संस्थेच्या सदस्यांनी कावळ्यांपासून सुटका करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून जीवदान दिले.
मालवण किनाऱ्यावरील मासळी लिलावाच्या ठिकाणी उमेश खांबोळकर यांना 'अमूर ससाणा' एका ठिकाणी बसलेला आणि कावळे त्याला बोचता आहेत अशा स्थितीत दिसून आला. प्रमोद खवणेकर व जगदीश तोडणकर यांनी युथ बिट्स फॉर क्लायमेट संस्थेशी संपर्क साधला. संस्थेचे भार्गव खराडे आणि अक्षय रेवंडकर हे दोघेही मत्स्य लिलावाच्या ठिकाणी पोहोचले. अमुर ससाण्याला उमेश खांबोळकर यांनी कावळ्या पासून सोडवत पकडले. ससाणा थोडा घाबरलेला दिसत होता. अक्षय रेवंडकर यांनी या पक्ष्याची ओळख पटवत अमूर ससाणा हा अतिशय दुर्मिळ पक्षी असल्याचे सांगितले. तो कबुतरा पेक्षा थोडा लहान आहे, त्याची चोच डोळ्या सभोवतालचा भाग, पाय, पिवळसर नारंगी रंगाचे होते. छातीकडचा भाग करडा आणि त्यावर काळ्या आडव्या पट्ट्या होत्या. शेपटीचा भाग थोडासा पट्ट्याचा आणि काळ्या रंगाचे पीस दिसत होते. 'अमूर ससाणा' हा सायबेरिया आणि उत्तर चीनमध्ये प्रजनन करतो. हिवाळ्याच्या दरम्याने भारतात येतो. सलग पाच हजार किलोमीटर अंतर न थांबता अरबी समुद्र पार करण्याची क्षमता या छोट्या पक्षात आहे.
यावेळी अक्षय रेवंडकर यांनी दर्शन वेंगुर्लेकर, मेगल डिसोजा, साहिल कुबल, स्वाती पारकर या सदस्यांना बोलावून घेतले तसेच पक्षी तज्ञ आणि वन खात्याला माहिती दिली. या पक्ष्याला नैसर्गिक अधिवासात आणि कावळ्यांची संख्या कमी असणार भागात सोडावे यावर सगळ्यांचे एकमत झाले. त्याप्रमाणे युथ बिट्स फॉर क्लायमेट या संस्थेच्या टीममधील अक्षय रेवंडकर, स्वाती पारकर, दर्शन वेंगुर्लेकर, साहिल कुबल, भार्गव खराडे हे सर्व मिळून पक्षाला घेऊन कांदळवन असलेल्या भागात गेले. पक्ष्याला दर्शन खानोलकर यांनी हलकेच सोडल्यावर तो उडाला कांदळवनात एका फांदीवर जाऊन बसला. त्यानंतर तो त्याच्या दिशेने निघून गेला.






































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.