loader
Breaking News
Breaking News
Foto

मनुष्य बुद्धीने श्रेष्ठ होतो, जन्माने नव्हे - संजय मेहता

संगलट( खेड)( इक्बाल जमादार)- तालुक्यातील जि.प.शाळा साखळोली नं.१ शाळेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी गावच्या सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरीवले, पोलीस पाटील सुनिल गौरत, ग्रामअधिकारी अविनाश माळशिकारे व शाळेचे मुख्याध्यापक संजय मेहता यांचे हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्हार अर्पण करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मेहता यांनी“मनुष्य बुद्धीने श्रेष्ठ होतो, जन्माने नव्हे.”या आंबेडकरी विचाराने आपण पुढे जात राहिलो, तर भारत निश्चितच अधिक प्रगत, अधिक न्याययुक्त आणि अधिक समताधिष्ठित होईल.असे मनोगत व्यक्त केले. तद्नंतर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधत, मिशन आपुलकी अंतर्गत शाळेतील चौथी ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हिवाळी क्रीडास्पर्धेसाठी ग्राम अधिकारी अविनाश माळशिकारे व पोलीस पाटील सुनिल गौरत यांच्यावतीने स्पोर्ट किट(गणवेश) वाटप करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

यासाठी शाळेतील शिक्षक समीर ठसाळ यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी सरपंच दिक्षा तांबे, उपसरपंच दिनेश जाधव, तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा वैभवी गोरीवले, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण(बंडू काका)बर्वे, अंगणवाडी सेविका तनुश्री शिंदे, कोमल नवरत, महेश तांबे यांचेसह सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg