loader
Breaking News
Breaking News
Foto

पाटपन्हाळे महाविद्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

वरवेली (गणेश किर्वे ) - गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आय. क्यु. ए. सी. अंतर्गत सांस्कृतिक विभागाच्यावतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुभाष खोत यांच्या हस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कार्यकर्तुत्वाचा संक्षेपात आढावा घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व कार्य समजावून घेऊन त्यातील एकातरी कार्याचे किवा विचारांचे पालन आपल्या जीवन व्यवहारात करावे तेंव्हाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्यासारखे होईल असे म्हटले. तसेच सर्व विद्यार्थांनी आणि भारतीय नागरिकाने आपल्या संविधानाच्या नियमांचे पालन केले पाहिजेत. तसेच त्याचे रक्षण ही केले पाहिजेत ते आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे असे सांगितले. सदर कार्यक्रमाला डॉ. प्रसाद भागवत, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, कनिष्ठ लिपिक विश्वनाथ कदम, ग्रंथपाल धनंजय गुरव, ग्रंथालय परिचर परशुराम चव्हाण, नंदकुमार भेकरे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg