loader
Breaking News
Breaking News
Foto

विज्ञान प्रदर्शन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कल्पना देणारे व्यासपीठ होय- रामचंद्र सांगडे

संगलट खेड (इक्बाल जमादार) - सरस्वती विद्यामंदिर जालगाव येथे आयोजीत तालुकास्तरीय विज्ञानप्रदर्शनाची ५डिसें रोजी समीर गुजराथी यांचे अध्यक्षतेत सांगता झाली. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार ही काळाची गरज आहे; आणि हे सर्व गुण या शाळेतील विद्यार्थी आणि व्यवस्थापन यांचेकडून दिसून आले. या विज्ञानप्रदर्शनाने कृतकृत्य झालो असे सांगत यजमान शाळेतील असावरी देवगीरी या विद्यार्थिनीने इस्पायर अवार्ड स्पर्धेतील यशाने या जिल्ह्याला आणि राज्याला नाव मिळवून दिल्याबद्दल तिचे आणि शाळेचे विस्तार अधिकारी सुधाकर गायकवाड यांनी मनोगतात अभिनंदन केले. तर सदर विज्ञान प्रदर्शनाचे उत्साहपूर्ण आयोजन यशस्वीपणे पार पडले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण कल्पना, तांत्रिक मॉडेल्स, पर्यावरण-जागरूक प्रकल्प आणि S.T.E.M. क्षेत्राशी संबंधित उपक्रमांनी उपस्थितांचे मन जिंकले. असे गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत करून ‘करून शिकणे’ संस्कृती वाढवणे हे विज्ञान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट असून, यासाठी १९५ शाळांनी दाखवलेला सहभाग प्रशंसनीय आहे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांनी पुढे सरस्वती विद्यामंदिर शाळेतील सर्व व्यवस्थापचा तसेच तालुक्यातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, सहशिक्षक, पालक, नियोजीत सर्व समित्या तसेच सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. प्रदर्शनाची संकल्पना राबविताना दिलेली समन्वयाची साथ, स्थळ-व्यवस्था, मार्गदर्शन, तांत्रिक मदत आणि विद्यार्थ्यांना दिलेली प्रेरणा यामुळेच हा उपक्रम परिणामकारक आणि संस्मरणीय ठरल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच परीक्षक मंडळाचेही विद्यार्थ्यांना वस्तुनिष्ठ व प्रेरणादायी मूल्यमापन करून प्रोत्साहन दिल्याबद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले. गटशिक्षणाधिकारी यांनी शेवटी असेही सांगितले की, “विज्ञान प्रदर्शन हे फक्त एक कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारे व्यासपीठ आहे. या माध्यमातून उद्याचे वैज्ञानिक, संशोधक आणि तंत्रज्ञ घडवण्याची प्रक्रिया अधिक बळकट होते.”

टाईम्स स्पेशल

उपस्थित मान्यवर, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाल्याचे समाधान व्यक्त केले. तसेच अध्यक्षीय मनोगतात समीर गुजराथी यांनी प्रदर्शन निमित्ताने अध्यक्ष म्हणून संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देत, भाषा हे केवळ माध्यम आहे, तुम्ही कोणती भाषा शिकता या पेक्षा कसे शिकता हे महत्वाचे असून बक्षीस मिळणं न मिळणं यापेक्षा सहभाग महत्वाचा असून, सहभागाशिवाय बक्षीस शक्य नसल्याचे गुजराथी यांनी मनोगत व्यक्त केले. आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg