loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी-कोल्हापूर हायवेवर दाभोळे येथे डंपर पलटी! चालक किरकोळ जखमी

देवळे (प्रकाश चाळके) - रत्नागिरी-कोल्हापूर नागपूर महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील नागमोडी वळणावर एका डंपरचा (क्र. MH 08 AP 5653) अपघात झाला. समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाला बाजू देण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने डंपर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. हा डंपर रवी इन्फ्राबिल्ड प्रोजेक्ट या कंपनीचा असल्याचे समजते. डंपरचा चालक देवी लाल याला या अपघातात किरकोळ दुखापत झाली आहे. तो सुखरूप आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अपघातामुळे रस्त्यावर आज सकाळपासूनच रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त डंपर बाजूला करून रस्त्यावरील अडथळा दूर करण्यात आला, त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg