loader
Breaking News
Breaking News
Foto

भर बाजारात मुक्या जिवाचा अंत; भेडशीत हळहळ!

भेडशी (प्रतिनिधी) - येथील गजबजलेल्या भेडशी बाजारपेठेत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अगदी समोरच असलेल्या झुडपात एका गायीचा मृतदेह आढळून आला आहे. भरवस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी मागील काही काळापासून ही गाय मृत अवस्थेत पडून असूनही प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने प्राणीप्रेमी व व्यापाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सिंधुदुर्ग बँक परिसरातील मोकळ्या जागेत असलेल्या झुडपांमध्ये ही पांढऱ्या रंगाची गाय मृतावस्थेत पडलेली आहे. फोटोत दिसल्याप्रमाणे गायीचा देह झुडपांमध्ये अडकलेला असून, तिचा मृत्यू नक्की कधी झाला हे समजू शकलेले नाही. मात्र, आता मृतदेहावर माश्या घोंगावू लागल्या असून परिसरात दुर्गंधी पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टाइम्स स्पेशल

या घटनेबाबत बोलताना स्थानिक व्यापारी श्री. सूरज टोपले यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "बाजारपेठेसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी, जिथे शेकडो नागरिक आणि बँकेचे ग्राहक येतात, तिथे 'गोमाते'ची अशी अवस्था पाहणे क्लेशदायक आहे. प्रशासनाने एकमेकांकडे बोट न दाखवता माणुसकीच्या नात्याने तात्काळ कार्यवाही करावी आणि या गायीची सन्मानाने विल्हेवाट लावावी." बँकेच्या कामासाठी येणारे नागरिक आणि परिसरातील व्यापारी यांनाही या दृश्याचा त्रास होत असून, संबंधित स्थानिक प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी सूरज टोपले व इतर व्यापाऱ्यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg