loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन मुलीच्या छेड प्रकरणी आरोपींची निर्दोष मुक्तता

खेड (प्रतिनिधी) : - खेड-दापोली मार्गावरील व शहरापासून जवळ असणा-या एका गावातील मुलीची छेड काढणाऱ्या संशयित आरोपींची येथील जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. रिहान परकार व मुजम्मील सलीम कोंडविलकर अशी या दोन संशयित आरोपींची नावे असून त्यांच्यावतीने येथील प्रतिथयश वकील सुधीर बुटाला यांनी काम पाहिले. मिळालेला माहितीनुसार, खेड शहरात कॉलेज शिक्षणाला येणाऱ्या या अल्पवयीन मुलीला हे दोघे संशयित आरोपी छेड काढून त्रास देत होते. असाच प्रकार दि. ३ व ४ ऑगस्ट २०१७ रोजी सायंकाळी ५ च्या दरम्यान सलग दोन दिवस झाल्यानंतर याबाबतची रितसर तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलीसांनी आरोपी रीहान परकार व मुजम्मिल सलीम कोंडविलकर या दोघांविरोधात गुन्हा रजि.नं. १८८/२०१७, भा. दं.वि. कलम ३५४ ड, १ (१,४), ३५४ अ, १ (४) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम ११ (१), १२,३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र हा गुन्हा पोस्को अंतर्गत असल्यामु‌ळे जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी पक्षातर्फे पीडित बालीका तसेच बालीकेची आई आणि शेजारची महिला वगैरेंची साक्ष झाली. या सर्वांनी आरोपींनी कशा पद्धतीने छेड काढली याबाबत सविस्तर वर्णन केले.

टाईम्स स्पेशल

आरोपींच्या वतीने ॲड. सुधीर शरद बुटाला यांनी उलट तपास केला. उलट तपासामध्ये निश्चित वर्णन व बोललेले शब्द आणि कोणी बोलले हे स्पष्ट न झाल्यामुळे त्याबाबत ॲड. सुधीर बुटाला यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून जिल्हा न्यायालयाने दोन्ही संशयित आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg