loader
Breaking News
Breaking News
Foto

लग्नसराईची घाई, त्यात वृद्ध आईबाबांना सोन्याच्या दराची चिंता.. पण गावकर्‍यांनी दिला दिलासा

रत्नागिरी - गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ होत असताना या आठवड्यात सोन्याच्या दरात आश्‍चर्यकारक उच्चांक गाठला आहे. थेट खिसा रिकामा करणारा सोन्याचा दर असून ग्रामीण भागात लग्न सराईची घाई त्यात वृद्ध आईबाबांना सोन्याच्या दराची चिंता भेडसावू लागली आहे. चांदीच्या दरामध्ये वाढ झाली असून एका दिवसात चांदीचा भाव तीन हजार रुपयांनी वाढला. नव्या दरानुसार चांदीचा भाव जीएसटीसह १ लाख ८६ हजार ४३० प्रतिकिलो पोहचला. सोन्याचा दर जीएसटीसह १ लाख ३१ हजार ८४०, १० ग्रॅम असा पोहचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला असला तरी ग्रामीण भागातील जनतेला मात्र सोन्याचांदीच्या दराने यजमान चिंतीत झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुलीसाठी सोन्याचे दागिने घेणे परवडत नाही, इतका दर वाढला आहे. त्यामुळे आता गावपातळीवरील मानकरी सामंजस्याची भूमिका घेताना दिसत आहेत. स्वतःहूनच काही मंडळी सोनेचांदीच्या दागिन्यांपेक्षा मुलगी हाच दागिना आहे, असे समजून घ्या, भविष्यात तुम्हाला ती सोनेचांदी मिळवून देईल, असे बोलताना दिसत आहे. त्यामुळ काही प्रमाणात यजमानांना दिलासा मिळताना दिसत आहे. एका बाजूला बाजारपेठांमध्ये वाढते सोन्याचांदीचे दर तर ग्रामीण भागात गावकर्‍यांनी घेतलेला पुढाकार पाहता हे चित्र फारच दिलासादायक व आनंददायी असल्याचे म्हटले जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg