loader
Breaking News
Breaking News
Foto

जानेवारीपासून शिधापत्रिकेवरील धान्याच्या प्रमाणात बदल

संगलट खेड (प्रतिनिधी) - राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ नुसार अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना अंतर्गत लाभार्थ्यासाठी वितरीत करावयाचे अन्नधान्याच्या मासिक नियतन प्रमाणामध्ये बदल करण्यात आला आहे. अंत्योदय शिधापत्रिकेसाठी आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीसाठी मिळणाऱ्या एकूण धान्यात बदल न करता आहे त्या धान्यातील तांदूळ आणि गहू याच्या प्रमाणात बदल करण्यात आला आहे. हा बदल जानेवारी २०२६ पासून सर्व शिधापत्रिकांना लागू करण्यात येणार असल्याचे जिल्हापुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. त्यानुसार जिल्ह्यातील अंत्योदय कार्ड धारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका २० किलो व गहू प्रती शिधापत्रिका १५ किलो वाटप करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याआधी याच शिधापत्रिकेसाठी २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू देण्यात येत होता. आता तांदळाचे प्रमाण कमी करून गव्हाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. मात्र या रेशन शिधापत्रिकेसाठी सरासरी ३५ किलो इतकीच धान्यमर्यादा ठेवण्यात आली आहे.प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकेसाठी प्रती लाभार्थी ५ किलो धान्य या प्रमाणात आतापर्यंत ४ किलोतांदूळ आणि १ किलो गहू असा लाभदेण्यात येत होता.

टाईम्स स्पेशल

मात्र आता जानेवारी २०२६ पासून प्रती सदस्यांकरिता ३ किलो तांदूळ व २ किलो गहू असा बदलकरण्यात आला आहे. माहे डिसेबर २०२५ साठी पूर्वीचेच प्रमाण म्हणजेच अंत्योदय कार्डधारकांकरिता तांदूळ प्रती शिधापत्रिका २५ किलो व गहू प्रती शिधापत्रिका १० किलो वाटप आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्य संख्या प्रती सदस्यांकरिता ४ किलो तांदूळ व १ किलो गहू असे आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही याची सर्व रास्त धान्य दुकानदार व लाभार्थी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी राजपूत यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg