loader
Breaking News
Breaking News
Foto

चुकीचं रक्त दिलं अन् महिला दगावली, प्रसूतीवेळी घडला धक्कादायक प्रकार

सोलापूर : पंढरपूरमध्ये प्रसूतीदरम्यान चुकीचे रक्त दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. नातेवाईकांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा आरोप करत कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अनेकदा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव गेल्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे नातेवाईकांचा संताप अनावर होतो आणि मग रुग्णालयात हमरीतुमरीवर प्रकरण येतं.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पंढरपूर तालुक्यातील आढीव येथे राहणारी ही महिला आहे. आरती चव्हाण असं या महिलेचं नाव आहे. ती प्रसूतीसाठी रुग्णालयात आली होती. यावेळी तिला चुकीचं रक्त पुरवल्या गेल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर आणि रक्त संकलन केंद्राच्या गंभीर निष्काळजीपणामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांकडून करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

आरती चव्हाण यांना प्रसुतीदरम्यान रक्ताची आवश्यकता भासल्याने कुटुंबीयांकडून रक्त आणण्यात आले होते. मात्र रक्त गट न जुळवता दिलेल्या रक्तामुळे महिलेची प्रकृती अत्यंत बिघडली. तीन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत असून डॉ. गजानन बागल यांचे “स्वामी समर्थ ब्लड स्टोरेज सेंटर” शासनाने तत्काळ बंद केले आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागाने डॉक्टर आणि टेक्निशियनचे जबाब नोंदवले आहेत. या गंभीर प्रकारात अद्याप कोणाविरुद्धही गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र आरतीच्या मृत्यूमुळे पंढरपूरात एकच खळबळ माजली आहे.दरम्यान, एकीकडे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे सोलापुरात खळबळ उडालेली असतानाच सोलापुरातूनच एक चांगली बातमी समोर आली आहे. सोलापुरात दुसऱ्या एका रुग्णालयात अवघ्या 9 महिन्याचे बाळ आणि 91 वर्षीय वृद्धाची ‘टॅव्ही’ अति जटील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg