loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने संवाद अभियान

वरवेली (गणेश किर्वे) - राजापूर तालुका तेली समाज सेवा संघाच्या वतीने संवाद अभियान सुरू असून राजापूर तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी तेली समाजाची वस्ती आहे त्या त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन समाज बंधुभगिनींशी संवाद साधण्याचे काम राजापूर तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने सुरु आहे. त्या अनुषंगाने आडीवरे येथील विलास आडीवरेकर यांचे निवासस्थानी ता.राजापूर जिल्हा रत्नागिरी येथे आडीवरे, भालावली, कशेळी गावांमधील समाज बंधुभगिनींची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला परिसरातील बहुसंख्येने तेली समाज बंधुभगिनी उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीला वसंत सकपाळ गुरुजी यांनी प्रास्ताविक केले व उपस्थित जेष्ठ समाज बांधवांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन मान्यवरांचे स्वागत केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या बैठकीला रत्नागिरी तालुका कार्याध्यक्ष सचिन(बबलू)कोतवडेकर, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक राऊत, राजापूर तालुका अध्यक्ष विद्याधर राणे, जिल्हाध्यक्ष रघुविर शेलार यांनी रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ या संघटनेची स्थापनेपासुन ते सध्याची वाटचाल, संघटना उद्देश, राजापूर तालुका सद्यस्थिती, सध्याच्या आंबा व्यवसायाची स्थिती, ओबीसी म्हणजे काय आणि त्यामध्ये तेली समाजाची भुमिका, रत्नागिरी जिल्ह्याच्या ठिकाणी शहराजवळ उभारण्यात येत असलेले संपुर्ण तेली समाजासाठी स्वाभिमानाचे प्रतिक म्हणून तेली समाज भवन इत्यादी सर्वच महत्वाच्या विषयांवर चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या बैठकीला रत्नागिरी जिल्याच्या वतीने सचिव संदीप पवार तालुका उपाध्यक्ष मंदार कदम, शहर उपाध्यक्ष निलेश कोतवडेकर, कार्यालय प्रमुख अजय नाचणकर, राजापूर तालुका खजिनदार अर्जुन (भाऊ)लांजेकर, युवा कार्यकर्ते सुमेध सकपाळ, प्रशांत कुवेसकर, सिध्देश राणे हे आवर्जून उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

ही बैठक यशस्वी करण्यासाठी सर्वश्री विलास आडिवरेकर, रविंद्र सकपाळ, स्वनील सकपाळ, सुरेंद्र सकपाळ संतोष सकपाळ, अभिषेक आडिवरेकर, विजय सकपाळ, संदीप सकपाळ, विवेक आडिवरेकर, सुयश सकपाळ, शरद सकपाळ, विद्याधर आडिवरेकर, गणेश आडिवरेकर, राज आडिवरेकर, संतोष आडिवरेकर, रोहीणी सकपाळ, मिनल सकपाळ, वनिता आडिवरेकर, प्रतिभा सकपाळ इत्यादी सर्व तेली समाज बंधुभगिनींनी अतिशय चांगली मेहनत घेतली. शेवटी उपस्थितांना चहापान देऊन वसंत सकपाळ गुरुजींनी उपस्थित सर्वांचे आभार मानत बैठक समाप्त झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg