loader
Breaking News
Breaking News
Foto

जि. प. आदर्श शाळा मासू नं.1 शाळेत दि. 11 डिसेंबर रोजी नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) - गुहागर तालुक्यातील मासू बुद्रुक येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा मासू नं. 1 या शाळेत समता फाउंडेशन, भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय डेरवण, तालुका चिपळूण आणि ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सहकार्याने गुरुवार दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता ते दुपारी 02 :00 वाजता नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. या स्तुत्य उपक्रमाचे मासू पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत असून या नि :शुल्क नेत्र तपासणी शिबिराचा मासू पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन ग्राम विकास मंडळ मासू बुद्रुक या मंडळाचे अध्यक्ष विजय मसुरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर (मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिर) आयोजित करण्यात आले असून या शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची 1) निशुल्क तपासणी व योग्य सल्ला मार्गदर्शन केले जाईल. 2) मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची भक्त श्रेष्ठ कमलाकर पंत लक्ष्मण वालावलकर रुग्णालय डेरवण येथे नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्यात येईल. 3) मोतीबिंदू रुग्णांची ने - आण करण्याची राहण्याची, जेवणाची, व काळ्या चष्म्याची नि :शुल्क सोय करण्यात येईल. 4) मोतीबिंदू असलेल्या रुग्णांना भरतीची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल.

टाईम्स स्पेशल

हे नि:शुल्क नेत्र तपासणी शिबिर आणि मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया शिबिर यशस्वी करण्यासाठी ग्रामविकास मंडळ मासू बुद्रुक या मंडळाचे अध्यक्ष विजय मसुरकर, उपाध्यक्ष लक्ष्मण मास्कर, सरचिटणीस मंगेश मास्कर, चिटणीस देवजी डिंगणकर, विजेंदर सुनील नाचरे, सर्व खजिनदार गंगाराम आलीम, सदस्य महादेव नाचरे, दिनेश नाचरे, नंदकुमार आलिम, धाकू आलिम, यशवंत आलीम, अशोक मास्कर, प्रभाकर मास्कर, बबन नाचरे, सल्लागार पांडुरंग नाचरे, रामचंद्र मास्कर, बाबु नाचरे, सखाराम मास्कर, शेखर आलिम आदी. कार्यकर्ते पदाधिकारी विशेष मेहनत घेत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg