loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी टाइम्स'च्या बातमीची तत्काळ दखल! साटेली-भेडशीत कासार पिता-पुत्रांनी केले मृत गायीवर अंत्यसंस्कार

साटेली भेडशी (प्रतिनिधी) : येथील साटेली-भेडशी बाजारपेठेत माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शाखेसमोर मृत्यमुखी पडलेल्या एका गायीवर, प्रशासकीय यंत्रणेची वाट न पाहता येथील स्थानिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी स्वतः पुढाकार घेत अंत्यसंस्कार केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

साटेली-भेडशी येथील मुख्य बाजारपेठेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसमोर एक गाय मृत अवस्थेत पडलेली होती. वर्दळीचे ठिकाण असल्याने दुर्गंधी पसरण्याची शक्यता होती. या घटनेची माहिती 'रत्नागिरी टाइम्स'च्या सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित झाली. ही बातमी समजताच साटेली-भेडशी येथील स्थानिक व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धू कासार व त्यांचे वडील गुरू कासार यांनी या घटनेची लागलीच दखल घेतली.

टाइम्स स्पेशल

प्रशासकीय कार्यवाहीची किंवा इतर कोणाचीही वाट न पाहता, बातमी समजताच कासार पिता-पुत्रांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वखर्चाने जेसीबी मशीन उपलब्ध केले आणि योग्य ठिकाणी खड्डा खोदून मृत गायीला विधिवत व सन्मानपूर्वक दफन केले. 'रत्नागिरी टाइम्स'च्या माध्यमातून समजलेल्या बातमीवर तत्परतेने कृती करत मुक्या प्राण्याप्रति दाखवलेली ही संवेदनशीलता आणि सामाजिक भान जपल्याबद्दल सिद्धू कासार आणि गुरू कासार यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg