loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दापोली तहसीलदार अर्चना बोंबे यांचे अभिवादन

दापोली (प्रतिनिधी ) - डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण (निधन) झाले. महापरिनिर्वाण दिन हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन असून तो ६ डिसेंबर रोजी आयोजित केला जातो. दापोली तालुक्यातील लोकांनाही डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती प्रचंड आदर आणि विश्वासार्हतेची भावना देखील आहे. अशा या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने दापोली भूमी पावन झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यामुळे इतरांपेक्षा दापोली तालुक्यातील लोक महापरिनिर्वाण दिन कार्यक्रम असेल २६ नोव्हेंबर हा संविधान गौरव दिनाचा कार्यक्रम असेल नाहीतर १४ एप्रिल डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम एका आगळया वेगळ्या आणि आपुलकीच्या भावनेने साजरा करण्याची येथील लोकांची एक वेगळीच आणि टिकाऊ परंपरा आहे. ती परंपरा आज ६९ व्या वर्षीही महापरिनिर्वाण दिनाची जूनी परंपरा तशीच सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

त्यानुसार दापोली शहरातील केळसकर नाका येथील सानेगुरूजी बालोउदयानात असलेल्या भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला दापोली तहसीलदार अर्चना बोंबे (घोलप) यांनी पुष्पहार अर्पण करून महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला तालूक्याच्या वतीने आदरांजली वाहिली आणि अभिवादन केले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg