loader
Breaking News
Breaking News
Foto

आयडियल इंग्लिश स्कूल, म्हसळा येथे करिअर गाईडन्स कार्यक्रम उत्साहात

म्हसळा रायगड - आयडियल इंग्लिश स्कूल म्हसळा येथे विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा करिअर गाईडन्स कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. आयोजित उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा, उपलब्ध संधी तसेच त्यासाठी आवश्यक कौशल्यांची माहिती देणे हा होता. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉ. रेहान अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी, सखोल आणि भविष्यनिर्मितीस उपयुक्त असे मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसमृद्ध भाषणातून विद्यार्थ्यांना करिअरची दिशा, जीवनातील उद्दिष्टांची मांडणी, तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात आवश्यक असणाऱ्या कौशल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांनी योग्य नियोजन, सतत प्रयत्न आणि आत्मविश्वास यांच्या मदतीने उज्ज्वल करिअर घडविता येते, असा संदेश दिला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जमीर कादरी, माजी सभापती नाझिम हसवारे, अहमद अली पेणकर, रजाक मोमेन, रियाज घराडे, नाझिम डावरे, रफिक घरटकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवड, शिक्षणातील नवे पर्याय, व्यक्तिमत्त्व विकास, स्पर्धा परीक्षा, उद्योजकता आणि आधुनिक क्षेत्रातील बदलत्या संधी याबाबत उपयुक्त माहिती दिली.

टाईम्स स्पेशल

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये करिअरविषयक जागरूकता वाढून त्यांना भविष्यासाठी सकारात्मक दृष्टीकोन लाभला. स्कूल व्यवस्थापनाने अशा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगीण मार्गदर्शन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg