loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबडवे येथे महापरिनिर्वाणदिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन (आठवले) पक्षातर्फे अभिवादन

आबलोली (संदेश कदम) -विश्वभूषण विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव "आंबडवे" महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात आहे. बाबासाहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील मोहो येथे झाला असला तरी त्यांचे मूळ गाव हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील "आंबडवे" हे आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बाबासाहेबांच्या "आंबडवे" या मूळ गावी जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाच्या वतीने रिपब्लिकन पक्षाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस तथा नगरसेवक आदेशभाऊ मर्चंडे, मंडणगड तालुका युवक अध्यक्ष तथा उपसरपंच संकेत तांबे, मंडणगडचे गटविकास अधिकारी सुनील खरात, माजी नगरसेवक राजेश मर्चंडे, ग्रामस्थ नरेंद्र सकपाळ, सुदर्शन सकपाळ यांनी "आंबडवे" येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकात जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याला फुले अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना, पूजा पाठ घेऊन अभिवादन केले. यावेळी त्यांचे सोबत मंडणगड तालुक्यातील आंबेडकरी अनुयायी महिला, पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg