loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुक्यातील कोरेगाव संगलट रस्त्याची दुर्दशा

संगलट खेड (इक्बाल जमादार) - खेड तालुक्यातील अति महत्वाचा रस्ता असलेला व शासनाला महसूल मिळवून देणार्‍या कोरेगाव संगलट रस्त्याची मोठ्या प्रमाणात दूर्दशा झाली आहे. या रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडल्याने त्या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशाला आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत अनेक वेळा बांधकाम अधिकार्‍यांकडे संपर्क केला असता ते काही लक्ष देत नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर ग्रामस्थांना उडवाउडवीची उत्तर मिळत असतात. अनेक लोकांच्या प्रवास करताना कमरेचे मणके देखील सरकले असल्याची दुर्दैवाची बाब झाली आहे. या रस्त्याकडे संबंधित लोकप्रतिनि अक्षरशः दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या भागात मोठ्या प्रमाणात लोक वस्ती असून सदरचा हा रस्ता दापोली-मंडणगड-गुहागर या तीन तालुक्यांना जोडला जातो. या रस्त्यावर डांबरी रस्ता दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एक एक फुटावून अधिक खड्डे पडल्याने अनेक वेळा दुचाकी तीन चाकी गाडीचे अपघात होत आहे. याला जबाबदार कोण? असा आता प्रश्न जनतेतून थेट होत आहे. आता काही महिन्यावर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत. त्यावेळी दारोदार फिरणार्‍याला मतासाठी जनता त्याला चांगलीच धडा शिकवेल अशी चर्चा आहे.

टाईम्स स्पेशल

संबंधित लोकप्रतिनिधी जनतेच्या हितासाठी कोणताच निर्णय घेत नसल्याने आता दाद कुणाकडे मागायची? दापोली तालुक्यामध्ये मंत्री योगेश दादा कदम यांच्या माध्यमातून रस्ते चकाचक पाहण्यास मिळत आहेत. मात्र गुहागर मतदार संघातील रस्ता हा का दुर्लक्षित करण्यात येतो? याचे मागचे कारण काय? कोरेगाव संगलट रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चोरट्या वाळूचे चार चार ब्रास च्या गाड्या तसेच चोरट्या चिर्‍याच्या गाड्या धावत असल्याने दुचाकी तीन चाकी खड्ड्यांमध्ये गाड्यांच्या टायर जाऊन अपघात होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून आता प्रवास करावा की नाही? असेही बोलले जात आहे. सदरचा रस्ता झाला नाही तर येणार्‍या निवडणुकीमध्ये मतपेटीतून लोकांचा राग दिसून येईलच यामध्ये शंका नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg