वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील कोतळूक खांबेवाडी येथे ग्रामपंचायत वतीने पूर्ण झालेल्या नळपाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन सरपंच प्रगती मोहिते यांच्याहस्ते करण्यात आले. कोतळूक ग्रामपंचायत १५ वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या ग्रामस्थांच्या मागणीनुसार ही नळपाणी पुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी उपसरपंच सचिन ओक यांनी विशेष पाठपुरावा केला. कोतळूक खांबेवाडी येथील प्रत्येक घरात नळ कनेक्शन सुरू झाले असून विशेषतः महिलांची समस्या दूर झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
कोतळूक खांबेवाडी येथील सार्वजनिक विहीरीवरून विद्युत पंप, टाकी, पाईपलाईन करून ही योजना पूर्ण करण्यात आली. या नळपाणी पुरवठा योजना उद्घाटन कार्यक्रमाला उपसरपंच सचिन ओक, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण वरकर, कृष्णा खांबे, बबन खांबे, लक्ष्मण खांबे, दिनेश खांबे, विलास खांबे, संतोष निवाते, मंदा खांबे, सुवर्णा खांबे, मनस्वी खांबे, कुंदा निवाते, सुनंदा खांबे आदींसह महिला व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.










































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.