loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली शहरात वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरातून जाणाऱ्या आणि वाहतुकिच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या अशा मार्गावर अचानकपणे मोठ्या प्रमाणात वाहने आल्याने शनिवारी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. ही वाहतूक कोंडी सुटेपर्यंत एकाच ठिकाणी वाहनांना थांबवून राहावे लागले यात अनेकांचा वेळ वाया गेला. दापोलीतील केळशी ते दाभोळ पर्यंतचा समुद्र किनारा हा विशेष करून पर्यटकांच्या पसंतीस उतरतो. त्यामुळे जोडून सुट्ट्या आल्या कि पर्यटकांची पावले ही दापोलीकडे भटकंती करिता आपसूकच वळतात, तसे शनिवारी झाले. भटकंती करिता दापोलीत विविध ठिकाणांहून आलेले पर्यटक त्यातच दापोलीतील विविध ठिकाणच्या गावात वाहने घेऊन आलेल्या पुणे मुंबई आदी मोठ्या शहरातील चाकरमान्यांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिस प्रशासनाने त्याही परिस्थितीत रणरणत्या उन्हात उभे राहून मोठ्या हिमतीने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी जातीने प्रयत्न केले. मात्र वाहन चालकांना घाई असल्याने काही चालकांनी आपल्या ताब्यातील वाहने पुढे सरकवल्याने चालकांच्या काही चुकांमुळे तसेच केळसकर नाका तसेच एस.स्टॅड समोरील मंडणगड कडे जाणा-या मार्गावरील चौकात चहुबाजुनी वाहनांची वर्दळ वाढल्याने दिवसभर वाहतूक कोंडीच्या समस्येने शहरवासीयांना पुरते हैराण केले. त्यामुळे शहर वासींयांना वाहतूक कोंडी चा मोठा त्रास सहन करावा लागला. या वाहतूक कोंडीमुळे शहरात जाणारे रस्ते पुर्णपणे ब्लॉक झाले होते. त्यामुळे शहरातील दुकानांमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्यांचा खोळंबा झाला. तर शहरातील रिक्षा स्टँडवर जाणाऱ्या तसेच रिक्षेत बसलेल्या प्रवाशांना आपल्या ईप्सित ठिकाणी जाण्यासाठी वेळेवर पोहोचता न आल्याने त्यांचा उगाचच वेळ वाया गेला.

टाईम्स स्पेशल

तसेच पादचाऱ्यांना सुद्धा वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे शहरातील मारुती मंदिर पुलावर आंबे, कोकम, फणस, तसेच जांभळे, करवंद आदी कोकणमेवा विक्रिसाठी घेऊन बसलेल्या स्थानिक शेतकरी महिलांकडे खरेदी करण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे कोणीही ग्राहक फिरकले नाहीत. तर एस.टी. स्टॅड नजिक वाहतूक कोंडीमुळे तेथे कोकणमेवा विक्रिसाठी घेऊन बसलेल्या विक्रेत्यांकडेही कोणीच ग्राहक फिरकले नाहीत. कारण वाहने पार्क करण्यासाठी जवळ वाहन तळ नसल्याने येथे आलेल्या पर्यटकांना आंबे फणस आणि कोकण मेवा खरेदी करणे मनात असुनही वाहतूक कोंडीच्या समस्येमुळे कोकणमेवा खरेदी करता आला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg