दापोली (प्रतिनिधी) - दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालयाच्या विस्तार शिक्षण विभागाच्या अभ्यास मंडळावर कर्दे येथील प्रगतशील शेतकरी आणि सुप्रसिद्ध आंबा बागायतदार सचिन तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दापोली तालुक्यातील कर्दे येथील रहिवासी आणि जिल्ह्यात प्रगतिशील शेतकरी तसेच आंबा बागायतदार म्हणून नावाजलेले सचिन तोडणकर हे व्यक्तिमत्व उच्च शिक्षित असून त्यांनी आपल्या स्वकर्तृत्वाने शेती आणि शेतिविषयक विविध प्रकारचे नव नवीन प्रयोग यशस्वी करत फायदयाची शेती करत तालूक्यात एक आदर्श निर्माण केला आहे. असे हे अभ्यासू व्यक्तिमत्व केवळ शेती किंवा आंबा बागायतदार सिमित मर्यादित आहेत असे नाही तर त्यांनी पर्यटन व्यवसायाला नवा आयाम देत आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली आहे.
एक यशस्वी उद्योजक आणि सहकार क्षेत्रातील उत्तम जाण असलेले सचिन तोडणकर हे एका अग्रगण्य सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणूनही त्यांनी अंत्यत विश्वासपात्र काम करत व्यवसाय करणाऱ्या अनेक व्यवसायिकांना त्यांनी पत पुरवठा करत आपल्या पायावर आर्थिकदृष्ट्या भक्कमपणे उभे केले आहे. त्यांची सामाजिक बांधिलकीच्या न्यायाने काम करण्याची हातोटी, एखादी शासकीय योजना तसेच शेतिविषयक नवीन प्रयोग समजून सांगण्याचे त्यांचे कसब हे अनेकांना भावत असुन त्यांनी अवगत केलेले आपले शेतिविषयक ज्ञान आणि अनुभव हे आपल्या पुरते सिमित न ठेवता ते हातचे न राखता सर्वांनाच अवगत करून देतात त्यामुळे त्यांची जनमानसात एक वेगळीच ओळख आहे. कृषि विषयक कामे, ग्रामपंचायतचे सरपंच, पर्यटन व्यवसायिक, प्रगतशील शेतकरी, आंबा बागायतदार आणि उद्योजक क्षेत्रात कृषी विषयक विविध क्षेत्रात आपल्या कामाचा यशस्वी ठसा उटविलेल्या सचिन तोडकर यांना डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार शिक्षण विभागात प्रगतिशील शेतकरी/व्यक्ती प्रवर्गातून पुढील तीन वर्षांसाठी कृषी विस्तार शिक्षण आणि भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून नामनिर्देशित केले आहे.
कृषी विस्तार शिक्षण आणि भाषा अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून आपल्या मौल्यवान सूचना मांडण्याची सुवर्ण संधी त्यांना डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विदयापिठाने उपलब्ध करून दिली आहे. या त्यांच्या यशस्वी नियुक्तीचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, विभाग प्रमुख डाॅ. संतोष वरवडेकर, डाॅ. अशोक निर्बाण, डाॅ.दिपक हर्डीकर, डाॅ.हेमंत बोराटे, प्राध्यापक, डाॅ.रणजित महाडिक आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तोडणकर यांचे अभिनंदन केले आहे.










































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.