loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी; पहिल्याच पावसाने बळीराजा सुखावला

दापोली (​सागर गोवळे) - दापोली तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. कडक उन्हाळा आणि उकाड्याने हैराण झालेल्या दापोलीकरांना या पहिल्याच पावसामुळे मोठा दिलासा मिळाला असून, परिसरात गारवा निर्माण झाला आहे. ​मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी ठीक ७:३० वाजता तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर मध्यरात्री, म्हणजेच पहाटे ३:१५ च्या सुमारास पुन्हा एकदा पावसाने चांगलीच हजेरी लावली. रात्री झालेल्या या दमदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा या हंगामातील पहिलाच पाऊस असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दापोली शहरासह तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाने चांगली हजेरी लावली. यात प्रामुख्याने: चिखलगाव, मळे, दाभोळ, पंचनदी, आडी, कोळथरे ​या आणि अशा अनेक गावांमध्ये पावसाची पहिलीच हजेरी पाहायला मिळाली. तर एकिकडे रात्रभर विज पुरवठा खंडीत असल्याने नागरिकांचे हाल झाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg