गुणदे (वार्ताहर) - खेड तालुक्यातील शेलारवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत गणवाल प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गुणदे गणवाळ पाच आंब्याचा माळ या गावठाणात करण्यात आले आहे. गावठाणामध्ये स्मशानभूमी करता शासकीय जागा उपलब्ध आहे. परंतु प्रकल्पग्रस्तांच्या घरासमोर स्मशानभूमी होत असल्याने प्रकल्पग्रस्तांनी या जागेस विरोध केला असल्याने या गावठाणात स्मशानभूमी ही सुविधा अद्याप देण्यात आलेली नव्हती. मात्र गेले कित्येक वर्ष या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांकरता स्मशानभूमी व्यवस्था ही गावठाणापासून लांब अंतरावर ग्रामस्थांनी दिलेल्या खाजगी जागेत करण्यात आली होती.
अनेक वर्षानंतर ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन मानाजी सदाशिव आंब्रे व शहाजी सदाशिव आंब्रे या दोन्ही बंधूं आणि कुटुंबीयांनी स्वतःहून गणवाळ पुनर्वसन स्मशानभूमी करता गावठाणालगत तब्बल दहा गुंठे जागा विना मोबदला जलसंपदा खात्यास नावावर करून दिली. त्यामुळे आता पुनर्वसन व जलसंपदा खात्याकडून प्रकल्पग्रस्तांना देय असलेली नागरी सुविधापैकी स्मशानभूमी या जागेवर बांधण्यात येईल. मानाजी आंब्रे व शहाजी आंब्रे बंधूंनी व कुटुंबीयांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे सर्वच ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. काहीजण ग्रुप वर मेसेज टाकत होते की आमच्या प्रयत्नांना यश आले. मात्र मानाजी व शहाजी आंब्रे या बंधूनी आम्ही स्वतःहून जागा वाडीसाठी दिली आहे, हे जाहीर केल्याने त्यांना चपराक बसली.










































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.