मुंबई : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयोगाची तसेच मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेतली होती. यावेळी एसआयआर प्रकरणी चर्चा करण्यात आली होती. त्यानंतर मविआच्या शिष्टमंडळाने पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली होती. पात्र मतदारांची नावे वगळण्यात येऊ नयेत, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यावर आता राज्य मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यात एसआयआर प्रक्रिया ही अत्यंत पारदर्शकपणे राबवली जाणार असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून कमी केले जाणार नसल्याचे आश्वासन एस. चोकलिंगम यांनी दिले आहे. 2002 सालची मतदार यादी समोर ठेऊन मॅपिंग केले जाणार असून त्यात आपले किंवा आपल्या पालकांचे नाव जुळत आहे का हे पाहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
एस. चोकलिंगम यांनी पुढे सांगितले की, राज्यातील एसआयआर प्रक्रिया ही 29 जुलै पर्यंत सुरू राहणार असून मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन माहिती गोळा करणार आहेत. तसेच बीएलओ घरी आल्यानंतर कोणी उपस्थित नसेल तर त्यांना 29 जुलैनंतरही त्यांचे नाव नोंदवता येणार आहे.पुढे बोलताना एस. चोकलिंगम म्हणाले, एसआयआरची ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जात असून कोणत्याही पात्र मतदाराचे नाव यादीतून विनाकारण वगळले जाणार नाही. या कामासाठी राज्यात तब्बल 1 लाख 253 बूथ लेव्हल ऑफिसर नियुक्त करण्यात आले आहेत. जनगणनेचे काम संपल्यावर लगेचच या मोहिमेला प्रत्यक्ष सुरुवात होणार असल्याची माहिती चोकलिंगम यांनी दिली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाची घोषणा केली असून, या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे 9 कोटी 86 लाख 44 हजार 413 मतदारांच्या तपशिलाची घरोघरी जाऊन नोंद घेणार आहेत .














































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.