loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड मुळगाव विद्युत महावितरण अंतर्गत येणार्‍या खाडीपट्ट्यामध्ये विजेचा लपंडाव

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील मुळगाव महावितरण खात्याच्या अंतर्गत येणारा गावांमध्ये वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे. याबाबत सतत अधिकार्‍यांना सांगूनसुद्धा योग्य ती कार्यवाही करण्यात येताना दिसून येत नाही. यामुळे त्रस्त जनतेतून या अधिकारी वर्गाची त्वरित चौकशी करावी, अशी मागणी ऊर्जा मंत्री यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे जनतेतून बोलले जात आहे. याबाबत महाराष्ट्राचे राज्यमंत्री योगेश दादा कदम यांना देखील निवेदन देऊन कैफियत मांडण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खेड तालुक्यातील खडीपट्टा नांदगाव ते संगलट शेरवलीपासून ते होडखाड पन्हाळजेपर्यंत वारंवार दिवसातून अनेकवेळा विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने जनतेतून संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागामध्ये अनेक चक्क्या, विद्युत पुरवठ्यावर चालणारे उपक्रम तसेच नळ पाणी योजना, बोरवेल अशा अनेक उपक्रम खंडित झाले आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विजेच्या लपंडावमुळे बंद आहेत. तसेच संगलट परिसरामध्ये कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने घरातील उपकरणे जळण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार कोण?

टाईम्स स्पेशल

गेल्या काही दिवसापूर्वी परिसरातील जागरूक नागरिकांनी खेडचे कार्यकारी अभियंता बाबरेकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. मात्र त्या भेटीमध्ये काही उपयोग झाल्याचे दिसून येत नाही. त्यांनी जर आपल्या कार्यालयामध्ये न बसता खाडीपट्यांमध्ये फिरले असते तर जनतेच्या समस्या जाणून घेता आल्या असत्या. तरी या समस्यांबाबत योग्य कारवाई करुन वीज पुरवठा सुरळीत करवा, अन्यथा खेड कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा खाडीपट्ट्यातील जनतेचा मानस आहे, असे म्हटले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg