loader
Breaking News
Breaking News
Foto

पावसाळ्यापूर्वी फुटपाथ कामांची संजू परब यांच्याकडून पाहणी

सावंतवाडी : पावसाळा तोंडावर असताना येथील पादचारी मार्गाचे काम पूर्णत्वास न आल्याने या कामाची पाहणी माजी नगराध्यक्ष विरोधी नगरसेवक संजू परब यांनी केली. यावेळी फुटपाथवरील सिमेंट पाईप जीर्ण असल्याने त्याठिकाणी योग्य ती खबरदारी घेऊन काम करावे, अशी सुचना न.प. बांधकाम अधिकाऱ्यांना त्यांनी केली. यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

येथील मोती तलाव काठावर बांधला जाणाऱ्या पादचारी मार्गाची पाहणी परब यांनी केली. यावेळी त्यांनी न.प. बांधकाम अधिकाऱ्यांना सुचना केल्या.‌ पावसाळ्यात रस्त्यावर पाणी तुंबणार नाही, याची दक्षता घेण्यास त्यांनी सांगितले. दरम्यान, स्थानिक नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी या मार्गात फुटपाथवर असणारी अशोकाची वृक्ष वादळात पडली होती.‌ त्याठिकाणी पुन्हा नवीन वृक्ष लागवड करण्यासाठी योग्य नियोजन करून व्यवस्था करावी, तसेच असणारी अशोकाची झाडे पावसाळ्यात पडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी सुचना केली. यावेळी न.प. बांधकाम विभागाचे अभियंता तुषार सरडे, मनोज राऊळ आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg