loader
Breaking News
Breaking News
Foto

साहित्यिक कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम; चरित्र पुस्तक परीक्षणात राजेश वैज प्रथम

सावंतवाडी : आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्या तर्फे जानेवारी महिन्यापासून 'सुप्रसिद्ध साहित्यिक कै.कुमुद रेगे वाचन साधना उपक्रम' राबवला जात आहे. सहभागी चौदा वाचक दरमहा एक पुस्तक वाचून त्यावर परिक्षण लिहीत आहेत. एप्रिल महिन्यातील 'चरित्र' या साहित्य प्रकारात आजगाव-धाकोरे येथील राजेश वैज यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर नीलम कांबळे यांना द्वितीय आणि वैभवी रायशिरोडकर यांना तृतीय क्रमांक मिळाला. राजेश वैज यांनी मधु मंगेश कर्णिक यांच्या करुळचा मुलगा या पुस्तकाचे परिक्षण केले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या उपक्रमांतर्गत प्रियदर्शनी म्हाडगुत यांनी एपीजे अब्दुल कलाम यांच्या अग्निपंख, सरोज रेडकर यांनी हिम्मतराव बाविस्कर यांच्या बॅरिस्टरचं कार्ट, अरुण धर्णे यांनी गंगाराम गवाणकर यांच्या व्हाया वस्त्रहरण, नीलम कांबळे यांनी उर्मिला पवार यांच्या आयदान, स्नेहा नारींगणेकर यांनी किशोर काळे यांच्या कोल्हाट्याचं पोर, जयदीप देशपांडे यांनी प्र. के. अत्रे यांच्या मी असा झालो, सोमा गावडे यांनी लक्ष्मीबाई टिळक यांच्या स्मृतीचित्रे, वैभवी रायशिरोडकर यांनी जयवंत दळवी यांच्या आत्मचरित्रा ऐवजी, शेखर पणशीकर यांनी ग.दि.माडगूळकर यांच्या वाटेवरल्या सावल्या, सायली लोणे यांनी अनिरुद्ध पुनर्वसु यांच्या प्रभंजन, विशाखा वेंगुर्लेकर यांनी वि.दा.सावरकर यांच्या माझी जन्मठेप, विनय सौदागर यांनी शरद बाविस्कर यांच्या भुरा आणि माधुरी आठल्ये यांनी राजेंद्र देशपांडे यांच्या वृकोदर अशा चौदा चरित्रांचे परिक्षण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

कुडाळ येथील चोखंदळ वाचक प्रसाद रेगे यांनी पुरस्कृत केलेल्या या उपक्रमासाठी आजगावच्या अनिता सौदागर यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. त्यानी निकाल घोषित करून सहभागी वाचकाना वैयक्तिकरित्या त्रुटी कळविल्या आहेत. या उपक्रमाच्या संयोजनाचे काम विनय सौदागर यांनी पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg